कोल्हापूर

ताज्या बातम्या

 • जनजागृती अभियान : ज्योतिष शास्त्रच्या प्रचारासाठी उपक्रमरत्नागिरी : ज्योतिषशास्त्रच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळातर्फे महाराष्ट्रभर जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त ज्योतिष प्रसार दिंडीचा राज्यातील 73वा कार्यक्रम युनायटेड इंग्लिश स्कूूल, मरकडी, चिपळूण येथे 18 ते 2क् एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

 • अभ्यासक्रम बदलणार! लोकमत - २३ तास पूर्वी

  पाठय़पुस्तक मंडळ : तिसरी ते पाचवीर्पयतचा अभ्यासक्रमरत्नागिरी : महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे येत्या शैक्षणिक वर्षात (2क्14-15) राज्यातील तिसरी, चौथी व पाचवीर्पयतच्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. पाठय़पुस्तक मंडळाने याबाबत सर्व शैक्षणिक संस्था, अधिकृत पाठय़पुस्तके विक्रेते यांना कळविण्यात आले आहे.

 • आजचा दिवस मतदारांचा लोकमत - २३ तास पूर्वी

  राणो-राऊत यांच्यातच प्रमुख लढत : सिंधुदुर्गातील बंडामुळे राज्याचे लक्ष रत्नागिरी / कणकवली : विविध प्रकारचे आरोप, निवडक पण गाजलेल्या सभा, सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिका:यांनी घेतलेली बंडाची भूमिका आणि राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी दिलेला राजीनामा यांमुळे चांगल्याच गाजलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी उद्या (गुरुवार) मतदान होत आहे.

 • दीड लाखाचे मंगळसूत्र केले परत लोकमत - २३ तास पूर्वी

  नांदगांव : सुमारे दीड लाखाचे मंगळसूत्र.. अचानक गहाळ झाल्याचे लक्षात येताच तारांबळ.. मात्र, अशाही परिस्थितीत रिक्षा चालकामधील प्रामाणिकतेमुळे या महिलेची मौल्यवान वस्तू कोणताही मोबदला न घेता परत मिळाली आणि त्या महिलेच्या चेह:यावर पुन्हा एकदा समाधान दिसून आले. ही घटना आहे तळेरे येथे आठवडा बाजारादिवशी घडलेली.

 • उगाडेत बिबटय़ाला जीवदान लोकमत - २३ तास पूर्वी

  अथक प्रयत्न : चोवीस तासानंतर बाहेर काढण्यात यशदोडामार्ग : तालुक्यातील कुडासे (बेलाचे टेंब) येथील शेतविहिरीत पडलेल्या मादी जातीच्या दीड वर्षीय बिबटय़ाला वनविभागाच्या कर्मचा:यांनी 24 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यानंतर त्या बिबटय़ाला उगाडे परिसरातील वनविभागाच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

 • कोल्हापूर : डाव्या लोकशाही आघाडीचे कोल्हापूर मतदारसंघातील उमेदवार माजी आमदार संपतराव पवार यांनी आज (दि. 16) दिवसभर प्रत्येक गावांतील प्रमुख कार्यकत्र्याशी गाठीभेटी, चर्चा करण्यावरच भर दिला. पवार यांनी सडोली खालसा (ता. करवीर) येथे निवासस्थानी राहूनच प्रचारयंत्रणा राबवली.

 • कोल्हापूर : निवडणुकीचा जाहीर प्रचार थांबला आहे. उमेदवारांची कार्यालयामध्ये आता मतदानाच्या तयारीबाबत नियोजन सुरू असल्याचे चित्र आहे. महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी असलेल्या कार्यालयात उमेदवारांना भेटण्यासाठी व मतदानाच्या नियोजनाबाबत मतदारसंघातील कार्यकत्र्याची दिवसभर वर्दळ दिसत होती. कार्यकत्र्याच्या भेटीनंतर त्यांनी कोल्हापूर शहरालगतच्या परिसरातील मतदारांशी वैयक्तिक भेटी-गाठीद्वारे संवाद साधला.

 • कोल्हापूर : मंगळवारी प्रचाराची मुदत संपल्यानंतर धनंजय महाडिक यांचा आजचा दिवस कसा आहे हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ची टीम त्यांच्या कावळा नाका येथील प्रचार कार्यालयात पोहोचली. महाडिक कुठे आहेत असे विचारता ते बाहेर गेले आहेत, असे उत्तर कार्यकत्र्याकडून मिळाले. प्रचार कार्यालयात महिला, तरुण कार्यकर्ते त्यांची वाट पहात बसले होते. महाडिक यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता ते रुईकर कॉलनीतील घरात असल्याचे सांगण्यात आले.

 • कोल्हापूर : गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर बाजारात भाजीपाला खरेदी करताना खांद्याला अडकविलेली पर्स चोरटय़ाने लंपास केली. या पर्समध्ये 3 तोळ्याचे सोन्याचे गंठण, रोख रक्कम दीड हजार व किमती मोबाईल होता.

 • विद्यार्थी संघटनांची कसरत : संपर्कासाठी ‘वॉटस अॅप’, ‘फेसबुक’वर दिला भरसंतोष मिठारी ल्ल कोल्हापूर‘ग्रासरूट’वरील कार्यकत्र्यापासून मंत्री, खासदार यांच्यार्पयत सर्वजण आप-आपल्या पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यात विद्यार्थी संघटनांचादेखील समावेश होता. विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन पातळीवरील विविध परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी मतदारांर्पयत पोहोचण्यासाठी या संघटनांच्या कार्यकत्र्याना कसरत करावी लागली. त्यावर त्यांनी विद्याथ्र्याशी …

 • दुस:यांदा उपसा बंद : रोज 5क् एमएलडी पाणी थेट नदीत; प्रदूषणाचा प्रश्न गंभीरकोल्हापूर : कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे जयंती नाल्यातील सांडपाणी वळविण्याचे काम सुरू आहे. यासाठी गेल्या पंधरा दिवसांत दुस:यांदा नाल्यातील उपसा बंद ठेवण्यात आल्याने मंगळवारपासून दररोज सरासरी 5क् एमएलडी (दशलक्ष लीटर) मैलामिश्रीत पाणी पंचगंगेत मिसळत आहे. या सांडपाण्यामुळे अगोदरच प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली पंचगंगा ‘मैली’ झाली आहे.

 • मिशन व्होटिंग! लोकमत - २३ तास पूर्वी

  आज मतदान : 33 लाख मतदारांचा कौल कुणाला?कोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेला प्रचार, व्यक्तिगत चिखलफेक, नाटय़मय राजकीय घडामोडींनी रंगलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आखाडय़ासाठी आज (गुरुवार) मतदान होत असून कोल्हापूर मतदारसंघात 15 तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील 13 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

 • इचलकरंजी : कोल्हापूर येथील जयंती नाल्यामधील मैलायुक्त दूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळल्याने इचलकरंजी शहराचा पंचगंगा नदीतून होणारा पाणी उपसा ताबडतोब बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहरवासीयांना पुन्हा पाणीटंचाई भासणार आहे. साधारणत: 2क् एप्रिलपासून पूर्वीप्रमाणो एक दिवस आड नळाला पाणी मिळण्याची शक्यता आहे.

 • इचलकरंजी : येथील लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीअंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मतदानाचे साहित्य व मतदानाची इलेक्ट्रॉनिक यंत्रे 23 एस. टी. बसेसमधून 246 मतदान केंद्रांवर पाठविण्यात आली. सुमारे दीड हजारहून अधिक कर्मचारी उद्या (गुरुवार) होणा:या मतदानासाठी कार्यरत आहेत. या निवडणुकीवर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे या पालिकेचे मुख्याधिकारी सुनील पवार, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार व तहसीलदार जयश्री आव्हाड यांच्या साहाय्याने लक्ष ठेवून …

आणखी ताज्या बातम्या »