मुंबई

शिवाजी पार्क गहिवरले

परत या परत या बाळासाहेब परत या.. आसमंत दणाणून सोडणार्‍या या घोषणांनी रविवारी श्‍विाजी परिसर गहिवरला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमीत्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी येथे मोठा जनसमुदाय उसळला होता…

बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कवर नको

शिवाजी पार्कवर स्मृतिस्थळाच्या जागी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व्हावे, या मागणीला…

ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचे निधन

ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. छातीत दुखत अस…

सर्व मातांना भारतरत्न सर्मपित

भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणे, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी…

ताज्या बातम्या

 • कॅम्पाकोलात डीडीआरची हुकूमशाही!

  वरळीच्या कॅम्पाकोला कम्पाउंडमधील सहा वादग्रस्त इमारती ज्या जमिनीवर उभ्या आहेत ती जमीन मुळात बृहन्मुंबई महापालिकेची असूनही महापालिकेला पूर्णपणे अंधारात ठेवून सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधकांनी ही संपूर्ण जमीन व त्यावरील इमारती या सर्वांच्या मालकी हक्कांचे हस्तांतरण सहा सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना करून टाकले आहे!

 • आता मुंबईत प्रचाराचे धुमशान लोकमत - ८ तास पूर्वी
  आता मुंबईत प्रचाराचे धुमशान

  राज्यात दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार आज संपल्यानंतर आज रात्रीपासूनच मुंबईत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवसभर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर सभा घेतल्यानंतर रात्री मुंबईत परतून काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्यासाठी सभा घेतली.

 • दि. १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर-ठाणे या २१ किमी मार्गावर धावली. त्या ठाणे स्थानकाला आज १६१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या ऐतिहासिक स्थानकाची एकशेएकसष्टी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली.

 • निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर आता ठाणे महापालिका हद्दीत येत्या १ मेपासून नालेसफाईची कामे सुरू होणार आहेत. यासाठी साडेचार कोटींचा खर्च केला जाणार असून ३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण केली जाईल, असा दावा पालिकेने केला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने यंदा नालेसफाईची कामे वेळेत होणार का, असा सवाल उपस्थित झाला होता. महापालिकेने निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करा.

 • मीरा रोड पोलिसांच्या हद्दीत अनैतिक संबंधांतून प्रेयसीने प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने मित्राद्वारे प्रेयसीवर अँसिडहल्ला केल्याची घटना ७ एप्रिल रोजी घडली.

 • आम आदमी पक्षाचा होर्डिंग प्रचार

  दिल्लीत अल्पावधीतच सत्ता स्थापन करून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडवून देणार्‍या आम आदमी पार्टीकडून लोकसभा निवडणूक लढविण्यात येत आहे.

 • बिग बींच्या चित्रीकरणामुळे कामाचा खोळंबा

  लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने जोर पकडला असताना मालाड पश्‍चिमेकडील ‘पी-उत्तर’ वॉर्ड कार्यालयात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या चित्रीकरणादरम्यान नागरिकांसह राजकारण्यांचा विविध कामांसाठी खोळंबा झाल्याची घटना नुकतीच घडली.

 • मोदींच्या पंतप्रधानपदासाठी दलालाची गरज नाही

  सध्या नरेंद्र मोदींची देशभरात लाट आहे. त्यामुळे त्यांना पंतप्रधान बनण्यासाठी आम्हाला राज ठाकरेंसारख्या दलालाची गरज नाही, असा खोचक टोला भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अँड. अशिष शेलार यांनी लगावला आहे.

 • काँग्रेसला सोनियांच्या सभेची प्रतीक्षा

  मुंबईतील लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. उमेदवारांच्या प्रचाराने मुंबईतील वातावरण ढवळून निघाले असले तरी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रमुख नेत्यांची सभा झालेली नाही. २0 एप्रिल रोजी मुंबईत सोनिया गांधी यांची सभा होणार असून,कार्यकर्ते या सभेची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

 • निवडणूक आयोग आणि पोलिसांनी कॉटनग्रीन येथे लावलेल्या नाकाबंदीत एका चारचाकी वाहनाच्या चालकासह १५ लाख रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे.

 • प्रचार साहित्यावर नजर लोकमत - ९ तास पूर्वी
  प्रचार साहित्यावर नजर

  निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांच्या प्रचारासाठी छापण्यात येणार्‍या भित्तीपत्रके (पोस्टर), हँडबिल, पत्रक, फ्लेक्स, बॅनर, माहिती पत्रकावर निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. मुद्रण खर्चाचा तपशील न देणार्‍या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

 • मतदान करणे हे अत्यंत गरजेचे आहे. या वेळची निवडणूक ही जास्त महत्त्वाची आहे, असे मला वाटते. त्यामुळे नेतेमंडळी कशाप्रकारे भाषण करत आहेत?, त्यांचा अजेंडा काय आहे, पाटर्य़ांचे जाहीरनामे काय आहेत? हेही बारकाईने वाचले पाहिजेत. त्यामुळे आपला गोंधळ कमी होण्यास मदत होईल असे वाटते. महत्त्वाचे म्हणजे सर्वच नागरिकांनी मतदान हे केलेच पाहिजे.

 • मुंब्य्रातून १00 टक्के मालमत्ता कर वसूल व्हावा यासाठी महापालिका विविध युक्त्या लढवित असूनही या आर्थिक वर्षात त्यांना येथून केवळ ३८ टक्केच वसुली करता आली आहे.

 • निवडणूक आयोगाने मैदानावर सभा घेण्यास आणलेले निर्बंध, रोड शो आणि बाईक रॅलीवर वाहतूक पोलीसांनी घातलेले निर्बंध, शिवाय सभांसाठी खासगी सभागृहावर होणारा अवास्तव खर्च टाळता यावा; म्हणून लोकसभा उमेदवारांनी आता आपला रोख पदयात्रांकडे वळविला आहे. जवळजवळ सर्वच उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पदयात्रांवर भर दिला असून, आता त्यांची घोडदौडही पदयात्रांवरच अवलंबून असल्याचे चित्र आहे.

आणखी ताज्या बातम्या »