नागपूर

अधिवेशनापूर्वी ‘विदर्भा’च्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी !

नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. येत्या ९ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी ‘विदर्भ’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूरकरांना अनुभवण्यास मिळणार आहे. स्वतंत्र विद…

वीज दरवाढीचा उद्योगांना शॉक

नागपूर : निरंतर वाढत्या वीजदरामुळे राज्यातील उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दर कमी क…

नवीन कंपनी कायदा दिशा देणारा

नागपूर : प्रस्तावित कंपनी कायदा हा नवी दिशा देणारा व नव्या वाटा दाखविणारा आहे. हा कायदा सर्वसमावेशक असू…

रेल्वेच्या परीक्षेकडे ३८ हजार उमेदवारांची पाठ

नागपूर : रेल्वे भरती बोर्डाच्यावतीने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने शहरातील ११६ केंद्रांवर घेण्यात आलेल्या परी…

ताज्या बातम्या

 • नागपूर : जगात तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे भाकीत व्यक्त करण्यात येत आहे. कारण दिवसेंदिवस भूपृष्ठातील पाण्याची पातळी कमी होत आहे. भूपृष्ठातील पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवणार्‍या केंद्र सरकारच्या केंद्रीय भूजल बोर्डाने (सीजीडब्ल्यूबी) महाराष्ट्रातील २८ तालुक्यांत पाण्याचे भीषण संकट असल्याचे स्पष्ट केले आहे. या ठिकाणी उपलब्ध साठय़ापेक्षा उपसा अधिक असल्याचे कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे.

 • संदीप मानकर - अमरावतीअन्न व सुरक्षा मानके कायदा २00६ अधिनियमन २0११ नुसार खाद्यपदार्थ विक्रेते व उत्पादकांना कायद्याने नोंदणी करणे व परवाना काढणे बंधनकारक आहे. पूर्वी कार्यालयात जाऊन नोंदणी व परवाना काढावा लागत होता. परंतु अन्न व प्रशासन विभागाने ग्राहकांच्या सोयीसाठी १३ एप्रिल पासून नोंदणी व परवाना काढण्याची प्रक्रिया ऑनलाईन सुरु केली आहे.

 • गडचिरोली : गडचिरोली-चिमूर या नक्षलग्रस्त भागातील मतदार संघात निवडणूक प्रक्रिया पार पाडणे हे शासन व पोलीस दल या दोघांसाठीही अतिशय जोखमीचे काम ठरत आहे. गडचिरोली जिल्ह्यात २00९ व २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रक्रिया पार पाडताना दोन जवान शहीद झालेत. यापूर्वीही अनेक निवडणूकां दरम्यान पोलिसांना छोट्या-मोठय़ा चकमकींचा सामना करावा लागला आहे.

 • नागपूर : करोडो रुपयांच्या कोळसा घोटाळ्याप्रकरणी चंद्रपुरातील स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी चंद्रपुरातील दोन आणि नागपुरातील तीन अशा पाच ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या. धाडीत पोलिसांना करोडो रुपयांच्या कोळसा घोटाळ्याची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे. महाराष्ट्र स्टेट कन्झुमर को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकार्‍यांसह अनेकांचा या कोळसा घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय आहे.

 • संजय गज्जलवार - जिमलगट्टा(गडचिरोली)नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात पायाभूत सुविधा पुरविण्यात येत असल्याचा शासन कितीही दावा करीत असले तरी तो सोमवारच्या घटनेनंतर फोल ठरला आहे. अँम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध नसल्याने एका गर्भवती महिलेला चक्क बैलबंडीतून १0 किमी दूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. रस्त्यात बैलबंडीतच त्या महिलेची प्रसुती झाली. परंतु तिने मृत बालकाला जन्म दिला.

 • मिहानला मिळणार अखंड वीज लोकमत - १२ तास पूर्वी

  नागपूर : निरंतर वीज पुरवठय़ाबाबत मिहानमधील उद्योगांना आता दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) येथील युनिटला वीज पुरवठय़ाची महावितरणला परवानगी दिली आहे. गेल्या महिन्यात मिहान-सेझमधील उद्योगांना अभिजित समूहाने वीजपुरवठा बंद केल्यानंतर मिहान-सेझची नोडल एजन्सी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) एमईआरसीकडे नुकतेच अपील दाखल केले होते.

 • रामायणातील चित्ररथांनी रंगली शोभायात्रो

  नागपूर : भाविकांच्या चेहर्‍यावर हनुमंतांच्या श्रद्धेची भावपूर्णता, भक्तांच्या गर्दीने फुललेले रस्ते.. चौकाचौकात आकर्षकतेने साकारलेले रामायणातील प्रसंग. ध्वनिक्षेपकवर बजरंगबलीचा, रामनामाचा गजर.. तर कुठे डीजेवर ‘रामजीकी निकली सवारी..जय जय जय बजरंगबली’ यासारखी प्रभु राम आणि हनुमंताच्या भक्तीगीतांतून व्यक्त होणारी भावना..फटाक्यांची आतषबाजी..ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी उभारलेले स्वागतद्वार..

 • वादळाचा तडाखा लोकमत - १३ तास पूर्वी
  वादळाचा तडाखा

  नागपूर : वादळाच्या तडाख्यामुळे मंगळवारी सायंकाळी उत्तर नागपुरातील बेझनबाग, गुरुनानकपुरा, लुंबिनीनगर, नझूल ले आऊ ट आदी वस्त्यातील घरांची पडझड झाली. काही घरांवरील छपरे उडाली, झाडे पडली, वीज तारा तुटल्या. जोराचे वादळ व विजांच्या कडकडाटामुळे लोकांत प्रचंड घबराट पसरली होती. शहराच्या इतर भागातही वादळ व पावसामुळे नुकसान झाले. काही भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

 • तुमचे घर सुरक्षित आहे का ? लोकमत - १३ तास पूर्वी
  तुमचे घर सुरक्षित आहे का ?

  नागपूर : महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र न घेताच शहरात फ्लॅट वा घरांची सर्रास विक्री होत आहे. त्यामुळे तुम्ही खरेदी करीत असलेले नवीन घर सुरक्षेच्या दृष्टीने असुरक्षित तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 • ‘आठवणीतील कवी’ : बहारदार ‘काव्य मैफिल’ लोकमत - मंगळ, १५ एप्रिल २०१४
  ‘आठवणीतील कवी’ : बहारदार ‘काव्य मैफिल’

  नागपूर : शब्दसुरांचं एक मधूर नातं असून, ते कायम चैतन्यदायी असते. प्रतिभावान कवींच्या अर्थवाही शब्दांच्या काव्यअभिव्यक्तीला स्वरांचं कोंदण लाभलं की, त्या कवितेचं गोड गीत तयार होते. मैत्री परिवार व विष्णू मनोहर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार विक्रम हरकरे यांच्या स्मृतीला सर्मपित अशाच अर्थवाही स्वरूपाच्या गीत-काव्य अनुभूतीच्या ‘आठवणीतील कवी’ या दज्रेदार कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते.

 • महामानवास अभिवादन लोकमत - मंगळ, १५ एप्रिल २०१४
  महामानवास अभिवादन

  नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त उपराजधानीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री संविधान चौकात आतषबाजी करून अनुयायांनी बाबासाहेबांचा जन्मदिवस साजरा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, आज सकाळी इंदोरा, उंटखाना, टिमकी, गिट्टीखदान, हजारीपहाड, मेडिकल चौक, शताब्दी चौक, माटे चौक आदी परिसरातून भव्य रॅली दीक्षाभूमी व स्थानिक विहार परिसरात काढण्यात आल्या.

 • टक्का वाढला पण कुणाचा ? लोकमत - मंगळ, १५ एप्रिल २०१४
  टक्का वाढला पण कुणाचा ?

  नागपूर : लोकसभा निवडणुकीत वाढलेले मतदान आमच्याच पारड्यात पडणार असे समजून रिंगणातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी विजयाचे दावे सुरू केले आहे. २00९ च्या तुलनेत या निवडणुकीत सरासरी १४ टक्के मतदान अधिक झाले, हे येथे उल्लेखनीय.

 • समाजमन सरसावले लोकमत - मंगळ, १५ एप्रिल २०१४
  समाजमन सरसावले

  कळमेश्‍वर रोडवर फेटरी येथून दोन किमी आतमध्ये चिचोली गाव आहे. या गावाच्या बाहेर शांतिवन परिसर उभारण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्‍वासू सहकारी वामनराव गोडबोले यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या शांतिवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वस्तुसंग्रहालय आहे. या संग्रहालयात बाबासाहेबांच्या जवळपास ४00 ऐतिहासिक वस्तू ठेवल्या आहेत.

 • डॉक्टरांच्या चिठ्ठीवर आता एकदाच औषधी लोकमत - मंगळ, १५ एप्रिल २०१४

  जितेंद्र दखने - अमरावतीडॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीवर आता रूग्णांना फक्त एकदाच औषधी मिळणार आहेत. औषधी घेतल्यानंतर त्या चिठ्ठीवर तत्काळ त्या दुकानाचा शिक्का मारला जाणार आहे. आजारपणात डॉक्टरांकडे न जाता पूर्वीची चिठ्ठी दाखवून औषधी घेण्याच्या रुग्णांच्या मानसिकतेला यामुळे आता आळा बसणार आहे.

आणखी ताज्या बातम्या »