शोधा

देश

मोदींनी बदलले गांधींजींचे नाव, 'मोहनदास' ऐवजी म्हणाले 'मोहनलाल'

राजस्थानमधील सभेदरम्यान मोदींनी महात्मा गांधी यांच्या नावाचा 'मोहनदास करमचंद गांधी' ऐवजी 'मोहनलाल करमचंद गांधी' असा चुकीचा उल्लेख करत भाषणादरम्यान चुका करण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे.

‘जीवनदायी’ नवे जीवन देईल

महागडे वैद्यकीय उपचार ही एक मोठी समस्या आहे. गरिबांकडे उपचारासाठी पैसे नसतात. अनेकांना …

कोकेन तस्करीसाठी कन्डोमचा वापर

नायजेरिया, टांझानियासह आफ्रिकेतल्या अन्य देशांतले तरुण कोकेन तस्करीसाठी तेथे मिळणार्‍या ब्लॅक कन्डोमचा वापर मो…

गुंतवणुकीसाठी भारत सुरक्षित

गुंतवणुकीसाठी भारत हा सर्वाधिक सुरक्षित देश असल्याचा विश्‍वास पी. चिंदबरम यांनी व्यक्त केला. ते दुसर्‍या आशि…

ताज्या बातम्या

 • देशाच्या औषध निर्यातीत केवळ १.२ टक्के वाढ

  बौद्धिक संपदेशी निगडित (आयपीआर) मुद्यांवर अमेरिका आणि भारतात तणाव वाढत आहे. यादरम्यान भारताची औषध निर्यात केवळ १.२ टक्क्याने वाढून १४.८४ अब्ज डॉलरवर र्मयादित राहिली.

 • वित्तीय संस्था आणि राज्य शासनाच्या संपूर्ण प्रकल्पाच्या तारण, गहाण खतावरील हक्कासंदर्भातील परिपत्रकात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्याने अनुसूचित जातीच्या औद्योगिक सहकारी संस्थांना मिळणार्‍या अर्थसाहाय्याच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

 • टपाल विभागाकडून ग्राहकांना दिले जाणारे कोणतेच धनादेश काही बँकांत वटले जात नसल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. दीड महिन्यापासून हा प्रकार सुरू असून, बहुसंख्य तक्रारी टपाल विभागाकडे दाखल झाल्या आहेत. धनादेश वटविण्यासाठी करण्यात येणार्‍या प्रक्रियेत बँकांकडून चूक होत असल्याने धनादेश वटले जात नसल्याचे टपाल विभागाचे म्हणणे आहे. या गोंधळात ग्राहकांना मात्र मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

 • २0१३-१४ मध्ये देशातील विमा क्षेत्रामध्ये तेजीचे वारे वाहू लागले असून प्रिमियममध्येही वाढ झाली आहे. भारतीय विमा नियामक प्राधिकरण (इर्डा)चे अध्यक्ष टी.एस.विजयन यांनी ही माहिती दिली.

 • ऑनलाईन बँकिंग व्यवहारांना गती व चालना देण्यासाठी तसेच ग्राहकाला सुरक्षिततेची हमी देण्यासाठी ते व्यवहार ‘डिजिटल सिग्नेचर’च्या माध्यमातून करण्यात यावे, अशी सूचना भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या एका अभ्यासगटाने केली आहे.

 • निवडणुकांच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार कुठल्या थराला जातील याचा नेम राहिलेला नाही. एकीकडे देशात वादग्रस्त वक्तव्यांचा जोर चालू असताना तेलंगणमध्ये मात्र एकाहून एक अजब फंडे वापरण्यात येत आहेत.

 • भाजपाचे नेते व बिहारमधील नवादा येथून पक्षाचे उमेदवार गिरिराजसिंह यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरावर पोलिसांकडून धाड टाकण्यात आली.

 • राहुल गांधी पंतप्रधान झाले तर गोध्रा हत्याकांडाबद्दल नरेंद्र मोदींना जन्मठेम भोगण्यासाठी तुरुंगात धाडले जाईल, या विधानाबद्दल केंद्रीय पोलादमंत्री बेनी प्रसाद वर्मा यांना तर मोदी पंतप्रधान झाल्यावर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना तुरुंगवास भोगावा लागेल, या विधानाबद्दल विश्‍व हिंदू परिषदेचे नेते विनय कटियार यांना निवडणूक आयोगाने नोटीस काढली आहे.

 • एखादा पुरुष व स्त्री रीतसर लग्न न करता दीर्घकाळ ‘पती-पत्नी असल्यासारखे’ एकत्र राहिले व त्यांना मुले झाली तर ती दोघं परस्परांशी विवाहित आहेत, असेच कायद्याच्या दृष्टीने गृहित धरले जाईल, असा महत्त्वाचा खुलासा सर्वोच्च न्यायालयाने ‘लिव्ह इन’ संबंधाच्या संदर्भात केला आहे.

 • हुंड्यात किडनी देऊनही छळच, पत्नीची आत्महत्या

  हुंड्यासाठी छळाच्या घटना दैनंदिन झाल्या असल्या तरी अमानवतेचे टोक गाठणारी व समाजमन आरपार हेलावून सोडणारी धक्कादायक घटना झारखंडमध्ये उघडकीस आली आहे.

 • सोन्याला मिळाली झळाळी चांदीचा भाव घसरला

  जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्‍वभूमीवर स्टॉकिस्ट आणि आभूषण निर्मात्यांकडून चांगली मागणी झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव उंचावला.

 • पद्मनाभ मंदिराचे लेखापरीक्षण करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

  आर्थिक गैरप्रकाराच्या आरोपांचा सामना करीत असलेल्या केरळच्या प्रसिद्ध श्रीपद्मनाभ स्वामी मंदिराच्या संपत्तीचे माजी नियंत्रक व महालेखाकार (कॅग) विनोद राय यांच्या देखरेखीखाली विशेष लेखापरीक्षण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.

 • झारखंडमध्ये मतदानानंतर नक्षली हल्ला : सहा जण ठार?

  झारखंडमध्ये मतदानानंतर मतपेटया घेवून जाणा-या गाडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्या सहा जण ठार झाले असून यामध्ये चार सुरक्षा रक्षकाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

 • उरले अवघे काही मिनिटे! लोकमत - १२ तास पूर्वी
  उरले अवघे काही मिनिटे!

  राज्या मतदानाला उत्साहात सुरूवात झाली असून मतदानाला अवघे काही मिनिटे उरले आहे. राज्यासह अनेक ठिकाणी उन्हाची तिव्रता आणि मतदार याद्याचा घोळ यामुळे अनेक ठिकाणी मतदानांची टक्केवारीला लगाम लागल्याचे प्राथमिक चित्र आहे.राज्यात दुपारी तीन वाजेपर्यत सरासरी ३५.९२ टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.

आणखी ताज्या बातम्या »