शोधा
 • नुस्त्या शिव्या घालून काय होणार?

  लोकमत - शुक्र, १८ एप्रिल २०१४

  गेल्या अनेक पिढय़ा आपल्याकडे मुलाबाळांच्या मनावर एकच गोष्ट वारंवार बिंबवली गेली. राजकारण वाईट, राजकारणी वाईट.राजकारण ना, तसलेच लोक, ते काही आपल्यासारख्यांचं काम नाही, हा प्रचार घरोघरी मुरलेला आहे. त्यात आता आणखी एक भर पडली आहे, या देशात जो काय वारेमाप भ्रष्टाचार होतो, तो सगळा भ्रष्टाचार राजकारणी आणि सरकारी नोकर करतात.बिच्चारी, सामान्य माणसं, ती कुठे भ्रष्टाचार करतात? आणि सामान्य माणसं म्हणजे कोण तर आपण, आपण सगळे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ. आपली काय चूक? ‘आपण’ स्वच्छ, नीतीवान आणि ‘ते’ सगळे भ्रष्ट हे असे वातावरण आपणच सोयीस्करपणे तयार करतो. आणि विसरतो की, ही लोकशाही आहे इथे यथा प्रजा तथाच राजा असणार.त्यामुळे आपल्या आजच्या बर्‍या-वाईट राजकीय परिस्थितीला आपण जनता म्हणून जबाबदार आहोत.पण ही जबाबदारीच आपल्याला मान्य नाही, गेल्या पासष्ट वर्षांतली ही उदासीनताच आपल्या या अवस्थेला कारणीभूत आहे. आपला राजकारणाचा विचार फक्त निवडणुकीपुरताच असतो. निवडणुका झाल्या की राजकारणाशी आपल्याला काही देणंघेणं नसतं. पुढली पाच वर्षं चालू दे जे चाललंय ते, हा आपला खाक्या. मुख्य म्हणजे आपल्याही चुका आहेत हे आधी मान्य करायला हवं, तरच आपण काही सुधारणा करू शकू.त्यातली एक चूक म्हणजे भ्रष्टाचार राजकारणी, नोकरदार आणि इतर लोक करतात आपण नाही हा समज. भ्रष्टाचार हा काही फक्त पैशाचा आणि काही हजार कोटींचाच नसतो. जे जे म्हणून भ्रष्ट आचरण तो सगळा, भ्रष्टाचारच. सिग्नलला न थांबता सुसाट पळणं, सगळे नियम तोडून वाट्टेल ते वागणं हादेखील भ्रष्टाचारच. आणखी »नुस्त्या शिव्या घालून काय होणार?

 • आम्ही पाहिला बदल..

  लोकमत - शुक्र, १८ एप्रिल २०१४

  भारतभर फिरताना ‘सत्यमेव जयते’च्या टीमला काय दिसलं?‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाचं संशोधन करण्यासाठी मी आमच्या टीमबरोबर देशभर फिरले.गावखेड्यात गेले, माणसं भेटली, बोलली, कुणी प्रश्न सांगितले, कुणी अनुभव.या सार्‍यात भारताच्या ग्रामीण भागाचा एक बदलता चेहरा आम्ही पाहत होतो. ग्रामीण भागातल्या तरुण मुलामुलींना राजकीय-सामाजिक भान वेगानं येतंय. ती जागी झाली आहेत, प्रश्न विचारत आहेत आणि आपल्या हक्कांविषयी तर कमालीची जागरूक आहेत. हे सगळं चांगलंच आहे, घडायलाच हवा होता असा हा बदल आहे आणि मुख्य म्हणजे शहरी भारतापेक्षा खूपच वेगळी आहे या ग्रामीण तारुण्याची वृत्ती.शहरी भागातले तरुण स्वकेंद्री आहेत. सगळे हक्क, सगळ्या मागण्या, सुविधा हे सारं मिळावं याचा विचार करताना प्रत्येक जण स्वत:पुरता विचार करतो. आणखी »आम्ही पाहिला बदल..

 • हे का जमू नये आपल्याला ?

  लोकमत - शुक्र, १८ एप्रिल २०१४

  निराशेची बोचसंशोधनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या देशात जाण्याचा योग मला आला. त्यानिमित्तानं मला हे प्रकर्षानं जाणवलं की प्रत्येक ठिकाणची प्रशासकीय प्रक्रिया म्हटलं तर आपल्यासारखीच जटील आणि कठीण आहे, पण तिथे नियमापेक्षा माणसाला अधिक महत्त्व दिलं जातं. जे आपल्याकडे कमी प्रमाणात दिसतं.साध्यासाध्या गोष्टींमध्ये सुसूत्रता आणणं अजून जमत नाही आपल्याला. देशाबाहेर अनुभव घेतल्यावर ही बोच जास्त जाणवते. फार खटकतं अशा वेळी.. आणखी »हे का जमू नये आपल्याला ?

पृष्ठांकन

(50 वृत्त)