शोधा
 • घरच्याघरी गॅस

  लोकमत - बुध, ९ एप्रिल २०१४

  समजा महिन्यातले काही तास आपण घरच्या घरी तयार केलेला गॅस वापरला तर..? किमान सकाळचा चहा तरी घरी तयार केलेल्या गॅसवरच केला तर ..? - फार अशक्य नाहीये हे!निर्मला कंदलगावकर एक साधीसुधी गृहिणी. घरच्या घरी काही तरी प्रयोग करण्यात त्या वर्षातले तीनशे पासष्ट दिवस व्यस्त असतात. त्या जेव्हा पहिल्यांदा आमच्या सेंटरमध्ये आल्या तेव्हा त्यांच्या हातात पिंजरासदृश असं काही तरी होतं. आम्ही त्यांना उत्सुकतेनं विचारलं की हे काय? तेव्हा त्यांनी गांडूळ खताच्या पिंर्ज‍याशी आमची ओळख करून दिली. त्या म्हणाल्या की, हा गांडूळ खत तयार करण्याचा पिंजरा आहे. तुम्ही तुमच्या सेंटरमध्येही गांडूळ खत तयार करू शकता, कारण गांडुळांचं मुख्य खाद्य तर तुमच्या सेंटरमध्ये भरपूर आहे.’ निर्मलाताईंचं म्हणणं अगदी खरं होतं. आमच्या सेंटरमध्ये चिक्कार पालापाचोळा जमा होतो. झाडलोट झाल्यावर तसाही तो वायाच जातो. तो वाया जाण्यापेक्षा त्याचं खत झालं तर..! ही निर्मलाताईंची सूचना आम्हाला खूपच आवडली. आम्हीही लगेच तयारी दाखवली. मग निर्मलाताईंनी आम्हाला अगदी सोप्या भाषेत गांडूळ खत तयार करायची पद्धत सांगितली. आम्ही सगळे चहा घेताना त्या म्हणाल्या की, आम्ही सकाळचा चहा घरी तयार केलेल्या गॅसवरच करतो, त्या चहाची चव काय मस्त लागते म्हणून सांगू..? घरच्या घरी गॅस ऐकून अगदी गंमतच वाटली. कसं शक्य आहे..? या आमच्या प्रश्नावर मग निर्मलाताईंनी आम्हाला घरच्या घरी गॅस बनवण्याची कृती अगदी सोप्या भाषेत सांगितली. निर्मलाताईंनी सांगितल्याप्रमाणे, सगळ्यांच्याच घरांमध्ये खरकटं किंवा वाया गेलेल्या अन्नाचं काय करायचं? हा प्रश्न असतो. हो की नाही? ते अन्न वाया न घालवता जर त्याचा वापर करून गॅसनिर्मिती करता आली तर? आणखी »घरच्याघरी गॅस

 • बायकांच्या कनवटीला सत्तेच्या चाव्या

  लोकमत - बुध, ९ एप्रिल २०१४

  महिला आरक्षणाच्या बळावर सत्तेमध्ये सहभागाची संधी मिळते, तेव्हा राजकारणाचा गंध नसलेल्या सर्वसामान्य बायका काय (काय) करू शकतात? मुंबईत ‘सखी’ला भेटल्या अशाच चारचौघी. दोघी महाराष्ट्रातल्या आई-माई-अक्का तर दोघी थेट गुजरातेतून आलेल्या बेन!- त्यांच्याशी जमलेल्या गप्पांच्या मैफलीतून उलगडलेली त्यांची कहाणी!निवडणुका आणि बायका, बायका आणि सत्ता, बायका आणि राजकरण हा संबंध आता पूर्वीइतका खूप दूरचा किंवा अभावानेच बघायला मिळणारा असा राहिलेला नाही, शहरात अन् गावातही..पण म्हणून बायकांच्या सत्तेतल्या सहभागाला, राजकारणातल्या तिच्या महत्त्वाकांक्षेला पुरुषसत्ताक समाजात, संस्कृतीत आणि राजकारणात सहज स्वीकारलं गेलं, असं मात्र झालं नाही. सत्तेतल्या-सत्तेत येऊ पाहणार्‍या बाईला विरोध, तिला आव्हान, तिचा अपमान, तिच्याविरोधात कटकारस्थानं असं सर्व काही झालं. पण बायका न डगमगता पाय रोवून उभ्या राहिल्या. स्वत:च्या हिमतीवर त्यांनी निर्णय घेतले अन् राबवूनही दाखवले. हे सर्व फक्त शहरातल्या बायकांनाच शक्य झालं असं नाही तर गावातल्या बायकांनीही डोक्यावरचा पदर कमरेला खोचून सरपंच बायका म्हणजे पदराआडून राजकारण करणार्‍या पुरुषांची सोय नाही हे सिद्ध करून दाखवलंय. ‘या काय काम करणार, या तर फक्त सह्याजीराव’ म्हणून हिणवल्या गेलेल्या सरपंच बायकांनी आपल्या बळावर गाव बदललं, गावातल्या इतर महिलांना सक्षम केलं. आणि राजकारणापलीकडचं समाजकारण करून दाखवलं. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातल्या आजी-माजी सरपंच बायकांशी सत्तेतल्या त्यांच्या सहभागाबद्दल ‘लोकमत’ने मारलेल्या गप्पांचा हा संपादित भाग. आणखी »बायकांच्या कनवटीला सत्तेच्या चाव्या

 • कॉफीचं श्रीमंत सुख

  लोकमत - बुध, ९ एप्रिल २०१४

  पुस्तक वाचताना, टीव्ही पाहताना, गप्पा मारताना सोबत कॉफीचा मग सुख देतो! अप्रतिम स्वादानं सुखावणार्‍या कॉफीचं गुपित कॉफी पिकवण्यात आणि उकळवण्यात आहे..चहानंतर जगभरात प्यायलं जाणारं पेय म्हणजे कॉफी. अरेबिका आणि रोबस्टा या दोन प्रकारच्या कॉफीच्या बियांपासून कॉफी बनवली जाते. यापैकी अरेबिका जातीच्या बिया उत्तम समजल्या जातात. कॉफीची झाडं असतात. त्यांना बेरीसारखी फळं येतात. फळ विकले की लाल दिसतं. अशा प्रत्येक पिकलेल्या फळामध्ये दोन बिया असतात. उत्तम प्रतीची कॉफीची पूड ही नेहमी अरेबिका जातीच्या बियांपासून बनवली जाते. त्यातही सर्वात उत्तम जातीची कॉफी म्हणजे गुर्मे (¬४१ेी३) कॉफी. कॉफीची रोपं कशाप्रकारे आणि कुठे वाढविली जातात त्याठिकाणची समुद्रसपाटीपासूनची उंची, तेथील हवा असे अनेक घटक कॉफीच्या बिया गुर्मे प्रकारच्या आहेत की नाहीत हे ठरविण्यासाठी उपयोग पडतात. भारतात केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील डोंगरभागात लागवड केलेल्या अरेबिका जातीच्या बियांपासून गुर्मे कॉफी बनविली जाते. आणखी »कॉफीचं श्रीमंत सुख

पृष्ठांकन

(50 वृत्त)