सांगली

ताज्या बातम्या

 • रक्तदानाचे आवाहन : उन्हाळ्यासह महाविद्यालयांच्या परीक्षा व लोकसभा निवडणुकीचा परिणाममिरज : मिरजेतील रक्तपेढय़ांत रक्ताचा मोठा तुडवडा आहे. उन्हाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा व सुट्टय़ांमुळे रक्तदात्यांचे व लोकसभा निवडणुकीमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे रक्तदान चळवळीतील कार्यकत्र्यानी सांगितले. तुटवडय़ावर मात करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन सामाजिक संघटनांतर्फे करण्यात येत आहे.

 • जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट.. लोकमत - २२ तास पूर्वी

  उन्हाची तीव्रता वाढली : 25 टक्केच पाणीसाठा; बारा टँकर सुरू करण्याचा प्रशासनाचा निर्णयसांगली : जिल्ह्यात सध्या तीन टँकर सुरू असून, उद्यापासून आणखी 9 टँकर सुरू करण्यात येणार आहेत. खानापूर, आटपाडी व मिरज पूर्व भागातून टँकरसाठी मागणी होत आहे. जिल्ह्यात आता 25 टक्केच पाणीसाठा असल्याने आगामी पंधवडय़ात आणखी टँकरची मागणी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यावर टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

 • तहसीलदारांकडून कारवाई : खरातवाडीत वाळू उपसा रोखलाइस्लामपूर : खरातवाडी (ता. वाळवा) येथे आज दुपारी तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्या पथकाने कृष्णा नदीकाठी सुरू असलेल्या वाळू उपसा केंद्रावर छापा मारून बेकायदा वाळू उपसा रोखण्याची कारवाई केली. या कारवाईत वाळूचे 11 ट्रक, एक जेसीबी मशीन, ट्रॅक्टर अशी वाहने ताब्यात घेतली. कारवाईतील वाळूचा तपशील आणि दंडाबाबत माहिती मिळाली नाही. पंचनाम्याचे काम उशिरार्पयत सुरू होते.

 • दोन तासात मिळणार परवाना लोकमत - २२ तास पूर्वी

  परीक्षा घेणार : वाहतूक लायसन्सचे संगणकीकरणसांगली : वाहतुकीचा शिकाऊ परवाना आता दोन तासात मिळणार असून, यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. संगणकीकरण प्रणालीचे आज (बुधवार) अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार पवार यांच्याहस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक कविता नेरकर उपस्थित होत्या. अशी प्रणाली राबविणारे राज्यातील सांगली हे दुसरे कार्यालय आहे.

 • शाळा समित्या कुचकामी : प्ले-ग्रुपला प्रवेश शुल्क पंधरा ते वीस हजारसांगली : राज्य शासनाने इंग्रजी माध्यमाच्या शुल्कवाढीला लगाम घालण्यासाठीच शाळा समित्या स्थापन केल्या आहेत. परंतु, सांगली, मिरज शहरातील संस्थाचालकांनी शाळा समित्यांना हाताशी धरून प्ले-ग्रुपचे प्रवेश शुल्क दहा ते पंधरा हजार रुपयांर्पयत वाढविले आहे. अचानक वाढविलेल्या शुल्काविषयी पालकांनी विचारणा केल्यास विद्याथ्र्याना प्रवेश नाकारला जात आहे. संस्थाचालक आणि शाळा समित्यांच्या मनमानी कारभारामुळे पालकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत …

 • बुधगावातील प्रकार : माजी सरपंच गणोश पाटीलसह चौघांना अटकसांगली : सावकारी व्याजाने दीड लाख रुपये देऊन तीन वर्षात 28 गुंठे जमीन लाटल्याप्रकरणी कर्नाळ (ता. मिरज) येथील दोन सावकारांसह चौघांना अटक करण्यात आली.

 • तर्कवितर्क सुरू : विधानसभा निवडणुकीर्पयत मोठे बदलसांगली : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपमधील काही नेत्यांचे भवितव्य लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असल्याने, पक्षांतराच्या कुंपणावरील अशा सर्व नेत्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. निकाल काहीही लागला तरी, आगामी विधानसभा निवडणुकीर्पयत जिल्ह्यातील राजकीय समीकरणो बदलणार आहेत. याबाबतचे तर्कवितर्कही आता तज्ज्ञांमध्ये सुरू झाले आहेत.

 • वारणावतीत जल्लोष : इस्लामपूरच्या कार्यकत्र्याचा मटणावर तावअशोक पाटील ल्ल इस्लामपूरहातकणंगले लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार राजू शेट्टीच विजयी होणार, या विश्वासाने इस्लामपूर शहरातील साठ युवकांनी वारणावती-चांदोली (ता. शिराळा) परिसरात विजयोत्सव साजरा केला. श्रमपरिहाराच्या या ओल्या पार्टीत मांसाहार आणि वारणोच्या काठावरील वारुणीची रेलचेल होती, असे समजते. वारुणीच्या तालावर त्यातील काही कार्यकत्र्यानी बेभान होऊन जल्लोष केला.

 • कलशारोहण : कोळेकर महाराजांची उपस्थितीमिरज : मिरजेतील विजापूर वेस येथील विठ्ठल मंदिरात गुरुवार, 24 एप्रिलपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहणानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विजापूर वेस येथील विठ्ठल मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला आहे. या मंदिराची वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहणानिमित्त 24 ते 27 एप्रिलर्पयत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गुरुवार, 24 रोजी सायंकाळी 4 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सराफ कट्टा, तांदूळ मार्केट …

 • धनंजय भांगे : महिलेवर बलात्कार प्रकरण?सांगली : चोरीच्या गुन्ह्यातून पतीला सोडविण्याची हमी देऊन एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी करुन तिच्यावर दोन पोलीस अधिका:यांनी बलात्कार केल्याची न्यायालयात तक्रार दाखल झाली असल्याची चर्चा आहे. न्यायालयाने याप्रकरणी संबंधित अधिका:यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला असल्याचे समजते. यासंदर्भात विश्रमबागचे पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अद्याप आम्हाला कोणताही आदेश आला नाही. आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, …

 • ..तर ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४

  सीईओंचे बीडीओंना आदेश : 452 ग्रामपंचायतीत 19 दाखले देण्यासह ई-बँकिंग सेवा; ऑनलाईनच्या कामात दिरंगाईसांगली : जिल्ह्यातील 7क्4 ग्रामपंचायतींना संगणक दिले असून 68क् ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेटसह सर्व सुविधा दिल्या आहेत. येत्या 25 तारखेर्पयत ग्रामसेवकांनी आठ ‘अ’चा उतारा आणि जन्म-मृत्यूचे दाखले स्कॅनिंग करून संगणकावर लोड केले पाहिजेत. तरीही अनेक ग्रामसेवकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत असल्यामुळे, येत्या चार दिवसात अपूर्ण काम पूर्ण न केल्यास ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे …

 • सांगलीच्या दोघांना अटक लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४

  पंढरपुरात बनावट सोने विक्रीप्रकरणी कारवाईपंढरपूर (जि़ सोलापूर) : बनावट सोन्याचे मार्केटिंग करीत गंडा घालणारे दोघे मंगळवारी पंढरपूर पोलिसांच्या जाळ्य़ात अडकले. पंढरीतील एका सलून दुकानदाराला बनावट सोने विकत देत आणखी ग्राहक मिळवून दिल्यास एक तोळे सोने मोफत देण्याचे आमिष दाखविणारी ही टोळी पोलिसांनी अटक केली आहे.

 • टेम्पोच्या धडकेत दाम्पत्य ठार लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४

  ढालगाव : मिरज-पंढरपूर राज्य मार्गावर नागज फाटय़ावर (जत चौकात) टेम्पो व दुचाकी यांच्यात अपघात होऊन मोटारसायकलवरील पती-पत्नी ठार झाले. त्यांचा दीड वर्षाचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली.

 • कृष्णोत बुडून तरुणाचा मृत्यू लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४

  सांगलीतील घटना : तरुण कुपवाडचा; मित्रंचे पलायनसांगली : येथील कृष्णा नदीत पोहायला आलेल्या कुपवाडच्या बजरंगनगरमधील तरुणाचा बुडून मृत्यू झाला. जुबेर अकबर मणोर (वय 19) असे त्याचे नाव आहे. कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटावर आज (मंगळवार) सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. जुबेर नदीत बुडाल्याचे समजताच त्याच्या मित्रंनी पलायन केले.

आणखी ताज्या बातम्या »