सातारा

ताज्या बातम्या

 • सातारा : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला खाचखळग्यांतूनच मतदारराजाला जावे लागले. अनेकजण तर या खड्डय़ांना घाबरून घराबाहेर पडलेच नसल्याचे सांगितले जात आहे. पावसाळ्याआधी रस्ते तयार होतील का? याबाबत साशंकता असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

 • परळी : परळी खो:यातील कुस खुर्द येथील काळभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त ‘जागर मराठी संस्कृतीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाद्वारे इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या नाटय़मय कार्यक्रमातून कुस खुर्द गावात खुद्द शिवराय अवतरले आणि त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळाही रंगला.

 • कवठेची बगाड यात्र उत्साहात लोकमत - १९ तास पूर्वी

  कवठे : येथील भैरवनाथाची बगाड यात्र रविवारी व सोमवारी आयोजित केली आहे. दोन दिवसांच्या यात्रेचा आजचा मुख्य दिवस आणि भैरवनाथाचे बगाड हे या यात्रेचे वैशिष्टय़. बगाड घेऊ इच्छित असलेल्या लोकांचा कौल शनिवारी रात्री वाजता भैरवनाथाच्या मंदिरात लावण्यात आला. ज्यांनी यापूर्वी नवस बोललेला आहे व ज्याची नवसपूर्ती झालेली आहे, असे आठ लोक कौलासाठी प्रतीक्षेत होते.

 • सचिन जवळकोटे ल्ल सातारामतदानादिवशी भलेही क:हाडात ‘किटली’ची वाफ सुटली असेल; परंतु ‘राजें’च्या परंपरागत हक्काच्या ‘सातारा-जावळी’ पट्टय़ात ‘घडय़ाळा’चाच गजर झाला. मात्र, राजे गटाच्या सर्व विरोधकांना ‘झाडू’न एकत्र आणणारे चोरगे या दोन तालुक्यांत किती ‘आकडा’ फोडतात, यावरच ‘घडय़ाळा’ची टिकटिक अवलंबून राहण्याची चिन्हे दिसताहेत.

 • मलकापूर : पोहण्यासाठी गेलेल्या बांधकाम व्यावसायिकाचा कोयना नदीपात्रत बुडून मृत्यू झाला. चचेगाव (ता. क:हाड) येथील ढेबाची मळी परिसरात ही घटना घडली. दादासाहेब विष्णू सूर्यवंशी (वय 52, सध्या रा. लाहोटीनगर-मलकापूर, मूळ रा. अपशिंगे) असे मृत्यू झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

 • महाबळेश्वर : महाबळेश्वर शहराला सलग दुस:या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी विविध पॉइंटवर गेलेल्या पर्यटकांची पावसामुळे पळापळ झाली.

 • सचिन जवळकोटे ल्ल साताराराष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात यंदाही ‘घडय़ाळ’च जोरात पळणार, अशी अटकळ अनेक रथी-महारथींनी बांधलेली; मात्र मतदानाच्या दिवशी क:हाड-पाटणमध्ये ज्या गतीनं ‘किटली’ फिरली.. ते पाहून भल्याभल्यांच्या गोटय़ा कपाळात गेलेल्या ! ‘अभिमन्यू’च्या आवेशात सातारच्या रणांगणात उतरलेल्या पुरुषोत्तम जाधवांना भरभरुन प्रतिसाद मिळालेला.

 • सातारा ल्ल प्रतिनिधीजिल्हय़ात जागोजागी शनिवारी दुपारनंतर वादळी वा:यासह पावसाने हजेरी लावली. या पावसाने हंगामी पिकांसोबतच फळबागांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक घरांचे पत्रे उडाले तर जागोजागी मोठी झाडे उन्मळून पडल्याने मुख्य रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली. आदर्की परिसरात तर हिमवृष्टीचा अनुभव लोकांनी घेतला. पाटणलाही गारपीट झाली.

 • लाच घेताना तलाठय़ाला पकडले लोकमत - रवि, २० एप्रिल २०१४

  खंडाळा : येथील तलाठी विजय व्यंकटराव भोसले (रा. खंडाळा) याला दोन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपतच्या अधिका:यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (शनिवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली.

 • सातारा : महाराष्ट्रातील ‘भारनियमन मॉडेल’ची दखल आता देशपातळीवर घेतली आहे. येथील भारनियमनाची पद्धती आता तामिळनाडू आणि बिहारसारखी अन्य राज्ये अंमलात आणू लागली आहेत. ‘महावितरण’च्या या कार्याची दखल देशपातळीवर घेतली असून, याच्या अभ्यासासाठी इतर राज्यांतील प्रतिनिधी महाराष्ट्रात येत असल्याची माहिती ‘महावितरण’च्या कार्यालयातून देण्यात आली.

 • कुसूर : शॉक लागलेल्या बारा वर्षीय मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या आईने धाव घेतली; पण मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात शॉक लागून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. क:हाड तालुक्यातील बामणवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेत बारा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 • सातारा : काळगाव (ता. पाटण) येथील ग्रामपंचायत सदस्य गुणवंत हरी कुष्टे (वय 43) यांच्या खून प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून, उत्तर प्रदेशमधील हरीष राकेशसिंग ठाकूर (22), दीपक उमाशंकर विश्वकर्मा (2क्), आसिफ इसाक शेख (2क्, सध्या रा. उल्हासनगर, ठाणो) यांना अटक करण्यात आली. कुष्टे यांच्या मित्रने त्यांच्याजवळ वीस लाख रुपये ठेवण्यासाठी दिले होते.

 • नांदगावात वीज पडून महिलेचा मृत्यू लोकमत - रवि, २० एप्रिल २०१४

  सातारा/देशमुखनगर : सातारा शहरासह क:हाड, पाटण, कोरेगाव, खटाव, वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांना वादळी वारे अन् मुसळधार पावसाने झोडपून काढले. नांदगाव (ता. सातारा) येथील महादेव नावाच्या माळावर किसनवीर साखर कारखान्याच्या ऊसतोड करणा:या कामगारांच्या झोपडीवर आज (शनिवार) सायंकाळी वीज कोसळली. यामध्ये एका महिला मजुराचा जागीच मृत्यू झाला.

 • कास पठारावर लूटमार करणा:या दोघांना अटक लोकमत - शनि, १९ एप्रिल २०१४

  मेढा (जि. सातारा) : कास पठार (ता. जावळी) येथे फिरण्यास गेलेल्या युवक व त्याच्या नियोजित वधूला मारहाण करून लुटणा:या साता:यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सातारा शहर पोलिसांनी अवघ्या बारा तासांत हा गुन्हा उघडकीस आणला. त्याचबरोबर जबरी चोरीचा आरोप असणा:या दोघांकडून लुटलेला ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली होती.

आणखी ताज्या बातम्या »