सोलापूर

ताज्या बातम्या

 • मोहोळ तालुक्यातील एकुरके येथील औदुंबर सोपान ढवण यांच्या शेतातील कडब्याच्या गंजीला सकाळी ११ वाजता अचानक आग लागली.

 • तालुक्यातील फिसरे येथे पशुचिकित्सालयाची इमारत बांधून तीन वर्षे झाली, पण अद्याप या इमारतीमध्ये पशुचिकित्सालय सुरू न झाल्याने ती धूळखात पडली आहे.

 • तालुक्यातील सातनदुधनी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिता सिद्धाराम गायकवाड यांची तर उपसरपंचपदी शिवाजी बाबू देवकते यांची निवड करण्यात आली.

 • शेतीचा वाद व पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून संतापलेल्या पतीने एकाच्या मदतीने युवकाच्या गुप्तांगावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास महुद बु॥, नागणखोरा (ता. सांगोला) येथे घडली.

 • मोहोळ तालुका पंचायत समितीच्या निर्मल भारत अभियान शौचालय अनुदान घोटाळ्यात पं. स. सभापती भारत गायकवाड यांच्या मुलाचे नाव ग्रामस्वच्छतादूत म्हणून पुढे आले आहे.

 • विठ्ठलाच्या चरणी आंधळगाव (ता. बाश्री) येथील बलभीम राऊत या सेवानवृत्त शिक्षकाने चांदीचा पण सोन्याचा लेप असलेला ४३५ ग्रॅम वजनाचा टोप अर्पण केला. याची किंमत १ लाख १0 हजार इतकी आहे.

 • टाकळी ते जुळे सोलापूरपर्यंत ३0 कि. मी. जलवाहिनी टाकण्यासाठीचा १६७ कोटींचा प्रस्ताव मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मुंबईत नगरपरिषद संचालनालयाचे संचालक पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सादर केला.

 • ग्राहकांची उदासीनता, ग्राहक चळवळीला आलेली मरगळ या आणि अन्य कारणांमुळे व्यापारी, विक्रेत्यांकडून ग्राहकराजाची सर्रास लूट सुरू आहे.

 • आत्महत्याग्रस्त कुटुंबाला लाखाची मदत लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४

  कारी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कै. महादेव दगडू जाधव यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे करत आरएसएम समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणो यांनी एक लाख रूपये मदतीचा धनादेश कुटुंबीयांकडे आज सुपूर्द केला. यामुळे या जाधव कुटुंबीयांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.

 • डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणातून आणि लिखाणातून श्रमिक वर्गासाठी साम्यवादी आर्थिक विचारांची मांडणी केली. कामगारांनी राजकारणापासून लांब राहणे हा अभिशाप होईल, असे बाबासाहेबांना वाटत होते. त्यासाठीच त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. त्यामुळे कामगारांच्या आर्थिक लढय़ाचे रुपांतर राजकीय शक्तीत होणे गरजेचे असल्याचे मत कॉ. तानाजी ठोंबरे यांनी व्यक्त केले.

 • वकिलाला जीवे मारण्याची धमकी लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४

  जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात एकाने चक्क वकील माझ्या विरोधीच्या बाजूने केस का लढवितो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.

 • ईव्हीएम मशीनची चुकीची जोडणी लोकमत - बुध, २३ एप्रिल २०१४

  सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातील कळमण येथील बुथवर ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) मशीनची जोडणी चुकीची करून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मतदान केंद्राध्यक्ष व पानमंगरुळ (ता. अक्कलकोट) येथील नूतन प्रशालेतील सहशिक्षक जी. एस. गायकवाड यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 • मुख्य सूत्रधार संदीप पाटील याने गणेश कुलकर्णी यांचा काटा काढण्यासाठी आरोपी जीपचालक संतोष कदम याला दोन लाखांची सुपारी दिली होती. इसारापोटी त्याने ५0 हजार दिले होते. ते पैसे आरोपी संतोष याने आपल्या छपराच्या घरातून काढून दिले, अशी महत्त्वपूर्ण साक्ष पंच रमेश उकिरडे यांनी न्यायालयासमोर मंगळवारी दिली.

 • मिळेल त्या ठिकाणी जाऊन बनावट सोन्याची मार्केटिंग करीत गंडा घालणारे दोघे मंगळवारी पंढरपूर पोलिसांच्या जाळ्यात सापडले. पंढरीतील एका सलून दुकानदाराला बनावट सोने विकत देऊन आणि आणखी ग्राहक मिळवून दिल्यास एक तोळे सोने मोफत देण्याचे आमिष दाखविणारी ही टोळी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने याचा पर्दाफाश झाला.

आणखी ताज्या बातम्या »