शोधा

विदेश

कोकेन तस्करीसाठी कन्डोमचा वापर

नायजेरिया, टांझानियासह आफ्रिकेतल्या अन्य देशांतले तरुण कोकेन तस्करीसाठी तेथे मिळणार्‍या ब्लॅक कन्डोमचा वापर मोठय़ा प्रमाणात करतात. आकाराने मोठय़ा कन्डोममध्ये कोकेन भरून हॉटडॉगसारखे बांधले जाते. पुढे या कोकेनच्या हॉटडॉगला जेली लावून …

‘दीपोत्सव’ची परदेशात दिवाळी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्या पुढाकाराने व्हाइट हाउसमध्ये दि…

२६/११च्या हल्ल्यासाठी मला मुंबईला यायचं होतं - अबू जुंदालची धक्कादायक माहिती

मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यासाठी निवडण्यात आलेल्या दहा दहशतवाद्यांसोबत मलाही यायचं होतं परंतू मला मुंबईला…

ट्विटरच्या वापरात सौदी सर्वात पुढे, भारत मागे

जगात ट्विटरच्या वापरात सौदी अरेबियातील नागरिक सर्वात पुढे तर भारतीय मागे असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्ष…

ताज्या बातम्या

 • युक्रेनचे नागरिकच सरकारविरुद्ध लोकमत - शुक्र, १८ एप्रिल २०१४

  पूर्व युक्रेनमध्ये रशियाचे सैनिक कारवाई करत असल्याचा आरोप रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी फेटाळला असून, युक्रेनचे नागरिकच नव्या सरकारविरोधात आंदोलन करत आहेत असा दावा केला आहे; पण युक्रेनचा भाग असलेले क्रिमिया बेट रशियन सैनिकांनीच ताब्यात घेतले, अशी कबुली प्रथमच दिली आहे.

 • ब्रिटनमध्ये आई १२, तर बाबा १३ वर्षांचे! लोकमत - शुक्र, १८ एप्रिल २०१४

  लंडनमध्ये १२वर्षीय मुलीने आपल्या मित्रापासून झालेल्या मुलाला नुकताच जन्म दिला असून, हे दोघे ब्रिटनमधील सर्वांत कमी वयाचे माता-पिता ठरले आहेत.

 • गेल्या ८ मार्च रोजी बेपत्ता झालेल्या मलेशियाच्या विमानाचा शोध घेण्याचा खर्च आता आवाक्याबाहेर जात आहे, विमान बेपत्ता होऊन ४0 दिवस होत आले तरीही अद्याप तपासातून काहीच हाती लागलेले नाही.

 • बेपत्ता मलेशियन विमानाचे अवशेष शोधण्यासाठी समुद्रात पाठविण्यात आलेल्या मानवरहित पाणबुडीची शोधमोहीम तांत्रिक समस्यांमुळे बुधवारी पुन्हा रद्द करण्यात आली.

 • काँग्रेस सदस्य एमी बेरा हे आपली जागा कायम राखण्यासाठी कॅलिफोर्नियामधून पुन्हा निवडणूक लढविणार आहेत. त्यासाठी एमी बेरा यांनी यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत ४ लाख ८५ हजार डॉलरपेक्षा अधिक रक्कम जमवली आहे.

 • भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयाना मान्यता देण्याच्या निकालाचे स्वागत अँमेन्स्टी इंटरनॅशनल व युनो या आंतरराष्ट्रीय संघटनांनी केले आहे.

 • युक्रेनच्या पूर्वभागात सरकारी रणगाडे लोकमत - गुरु, १७ एप्रिल २०१४

  पूर्व युक्रेनमध्ये सरकारी इमारतींचा ताबा घेणार्‍या रशियन सैन्याच्या विरोधात युक्रेनने सैन्य तैनात केले असून, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन यादवीच्या उंबरठय़ावर उभे असल्याचा इशारा दिला आहे.

 • दक्षिण कोरियात शाळकरी विद्यार्थ्यांना पर्यटनासाठी घेऊन जाणारे एक बहुमजली प्रवासी जहाज बुधवारी समुद्रात बुडाले. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला, तर २९२ जण बेपत्ता आहेत. बचाव पथकांनी हेलिकॉप्टर्स व जहाजांद्वारे प्रयत्नांची शर्थ करूनही शेकडो प्रवाशांचा थांगपत्ता लागू शकला नाही.

 • द.कोरियात जहाज उलटले, ४५० प्रवाशांचा जीव धोक्यात

  दक्षिण कोरियातील दक्षिण समुद्र किना-याजवळ ४५० प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी जहाज उलटले आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून उर्वरित प्रवाशांच्या सुटकेसाठी युध्दपातळीवर मदतकार्य सुरु आहे. या जहाजात बहसंख्य प्रवासी हे महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे समजते.

 • युक्रेनवरून ओबामांचा रशियाला इशारा लोकमत - बुध, १६ एप्रिल २०१४

  रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी आपला प्रभाव वापरून युक्रेनमधील फुटीरवाद्यांना शांत करावे. अन्यथा या कारवाईसाठी रशियाला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी पुतीन यांच्याशी झालेल्या दूरध्वनी चर्चेत दिला.गेल्या काही दिवसांत सशस्त्र रशियन सर्मथकांनी पूर्व युक्रेनमधील अनेक इमारतींचा ताबा घेतला.

 • अफगाणिस्तानात मंत्र्याचे अपहरण लोकमत - बुध, १६ एप्रिल २०१४

  अफगाणिस्तानचे सार्वजनिक कामकाज उपमंत्री अहमद शाह वाहीद यांचे काही बंदूकधारी व्यक्तींनी अपहरण केले आहे. राजधानी काबूल येथून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

 • बेपत्ता विमानासाठी दोन महिने लागणार लोकमत - बुध, १६ एप्रिल २०१४

  मलेशियाच्या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी पाण्याखाली सोडलेल्या रोबोसह पाणबुडीलाही विमानाच्या अवशेषांचा शोध घेता आलेला नाही, त्यामुळे पाणबुडीचा हा शोध बंद करण्यात आला असून, आता विमानाचे अवशेष शोधण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी लागेल, असे अमेरिकन नौदलाने जाहीर केले आहे.

 • पाकिस्तानमध्ये भावाला भेटायला गेलेल्या ठाण्यातील महिलेचा मृत्यू

  तब्बल १६ वर्षांनी पाकिस्तानमध्ये भावाला भेटायला गेलेल्या महाराष्ट्रातील महिलेचा ह्रदयविकाराच्या झटक्याने लाहोर रेल्वे स्थानकावर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

 • निवडणूक पाहायला येणार २0 देशांचे पाहुणे लोकमत - मंगळ, १५ एप्रिल २०१४

  खंडप्राय देश आणि सुमारे ८0 कोटी मतदार एवढा प्रचंड व्याप असलेली भारतातील लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पूर्णपणे नि:पक्षतेने शांततेत पार पाडून एकाच दिवसात निकाल जाहीर केला जाणे हा लोकशाहीच्या दिशेने लडखडती पावले टाकणार्‍या जगातील अनेक देशांच्या दृष्टीने अचंब्याचा आणि शिक्षणाचाही विषय आहे. म्हणूनच सध्या सुरु असलेली लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष पाहायला २0 देशांमधील तब्बल ४८ अधिकारी पाहुणे म्हणून येणार आहेत.

आणखी ताज्या बातम्या »